सर्वात वर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली – देशभरात आज कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सकाळी ६ वाजून २५ मिनिटाने  दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत बायोटेक ने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुळच्या पुद्दुचेरीच्या असलेल्या पी.निवेदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना लस टोचली. 

भारतात लसीकरण सुरु झाल्या पासून अनेकांच्या मनात संभ्रम आहे.परंतु कोणताही भीती  न बाळगता लस टोचून घ्या असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिला आहे.देशात १६ जानेवारी पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स यांना लस देण्यात आली.दुसरा टप्पा आज पासून सुरु झाला आहे. या मध्ये ६० वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. या निकषात पंतप्रधान मोदी बसत असल्याने त्यांनी आज लस घेतली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण सर्वजण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.