सर्वात वर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार

पंतप्रधान नेमके काय बोलणार या कडे देशवासीयांची लक्ष 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra)आज  सायंकाळी  ५ वाजता  देशवासियांना  संबोधित करणार आहेत. काही वेळा पूर्वी पंतप्रधान कार्यालयातुन ट्विटर वर हि माहिती देण्यात आली. 

अनेक राज्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी होते आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्य अनलॉक कडे वाटचाल करत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर पंतप्रधान आज नेमके काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. 

१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लसीकरण सुरु करण्या संबंधी केंद्रसरकाने घोषणा केली होती परंतु लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने हे लसीकरण थांबले आहे. या बाबत पंतप्रधान (Prime Minister Narendra) बोलणार का याबाबत हि उत्सुकता आहे.