
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

२२ मार्चला जनता कर्फ्यू :कोरोनाशी लढण्या साठी भारतीय सज्ज आहे याची हि चाचणी रविवारी २२ मार्चला कोणी हि घराच्या बाहेर पडू नये -पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)
नवी दिल्ली :खुप गरजेचे असेल तरच घरा बाहेर पडा आणि ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांनी काही आठवडे तरी घरा बाहेर पडू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतीयांना केले आहे. या रविवारी २२ मार्चला सकाळी ७ वाजेवासून रात्री ९ पर्यंत कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडू नये भारत या कोरोनाशी लढण्यासाठी किती सज्ज आहे याची चाचपणी होणार आहे. रविवारी २२ मार्चला कोणी हि घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
रविवारी सायंकाळी ५ वाजता सर्व भारतीयांनी आपल्या घराच्या दरवाजात उभेराहून जे कोरोना ग्रस्तांची सेवा करणाऱ्यांसाठी एकत्रित थाळी वाजवून किंवा घंटी वाजवून आभार प्रदर्शन करावे हि विनंती आहे असे हि पंतप्रधानांनी सांगितले.
कोरोनाचे संकट खूप मोठे आहे . एक देश दुसऱ्या देशाला मदत करू शकत नाही म्हणूच प्रत्येक भारतीयांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आपण सर्व मिळून कोरोनाशी लढतो आहोत परंतु कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही यावर अजून काही उपाय सापडला नाही. १३० करोड देशवासियांना संकल्प करायचा आहे. कि या महामारी साठी आपण केंद्रसरकार आणि राज्य सरकार ला सहकार्य करावा अशी अपेक्षा आहे. गर्दी करू नका .. गर्दीत जाऊ नका असे आवाहन ही पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
भारत पूर्ण शक्ती ने उभा राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
