सर्वात वर

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

पुणे-सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज पहाटे पुण्यात हृदयविकाराने निधन झाले ते ४७ वर्षांचे होते.सिव्हिल इंजिनियर असलेले नरेंद्र भिडे यांनी अनेक मालिका नाटक आणि चित्रपटाला जिंगल्स च्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.संगीत क्षेत्रातील प्रयोगशील संगीतकार गेल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे.

सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. नरेंद्र भिडे यांच्या पाश्चात आई ,वडील ,पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.नरेंद्र भिडे (Narendra Bhide) यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले.

नरेंद्र भिडे यांनी संगीत दिलेले चित्रपट

मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट , अनुमती , दिल ए नादान (बायोस्कोप) , देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी, मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला (हिंदी) याशिवाय श्वास, सरीवर सरी, माती माय सह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले.

नाटक

कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस , व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण आदी.

टिव्ही मालिका

अवांतिका, ऊन पाऊस, साळसुद, घरकुल, मानो या ना मानो, पळसाला पाने पाच, भूमिका, पेशवाई, नूपुर, अबोली, श्रावण सरी, सूर- ताल, कॉमेडी. कॉम, फुकट घेतला शाम, अमर प्रेम आदींचा समावेश आहे.