सर्वात वर

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओला दोन राष्ट्रीय पुरस्कार

नाशिक (प्रतिनिधी) : माहिती व प्रसारण मंत्रालय, दिल्लीतर्ङ्गे दिल्या जाणार्‍या राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारात ‘रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओला (Radio Vishwas) दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार-2020 चा नुकतीच घोषणा करण्यात आली.

सस्टेन अ‍ॅबिलीटी मॉडेल पुरस्कार विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून 50 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, थिमॅटीक पुरस्कार विभागात दुसरा क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 30 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘सर्वांसाठी शिक्षण’चा जाणिवेतून चौथी ते दहावी मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम. रेडिओ विश्वास वरुन प्रक्षेपित करण्यात आला. तो महाराष्ट्रातील सहा  कम्युनिटी रेडिओनी प्रसारीत केला. त्यामुळे कोविड काळात शिक्षणाची सोय झाली. निरपेक्ष समाजहिताच्या भावनेने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

तसेच मोस्ट इनोव्हेटिव्ह कम्युनिटी ऐंगेजमेंट पुरस्कार, प्रमोटींग लोकल कल्चर पुरस्कार अशा विभागातही पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या.आज भारतात ३१६ कम्युनिटी रेडिओ आहेत

समुदाय विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय ठेवून रेडिओ विश्वास (Radio Vishwas) कार्यरत आहे. सामान्य जनतेचे प्रश्‍न, लोक कलावंतांना व्यासपीठ, प्रामुख्याने तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. नाशिक स्पोर्टस् ङ्गेस्टीवल, जाणीव सामाजिकतेची, विश्वास आर्थिक साक्षरता अभियान, मतदान जनजागृती अभियान, बाल चित्रकला स्पर्धा, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, बचपन एक्सप्रेस, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सिंहस्थ कुंभमेळासाठी भाविकांपर्यंत माहितीपर कार्यक्रम व सूचना, प्रशासनासाठी रेडिओ विश्वासचे सहकार्य असे विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून रेडिओ विश्वासने स्थान प्राप्त केले आहे.

रेडिओ विश्वासचे (Radio Vishwas) मार्गदर्शक विश्वास ठाकूर यांच्या विविध आधुनिक संकल्पना यांचा समावेश आणि दर्जेदार कार्यक्रम यांचा अनोखा मिलाफ कार्यक्रमांमध्ये असतो. स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी, रूचिता ठाकूर व रेडिओ विश्वासची टीम आदींनी विशेष परिश्रम घेतले.