सर्वात वर

राज ठाकरे यांचे नाशिक शहरात आगमन

नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे आज (दि.५) सकाळी ११ वाजता नाशिक शहरात आगमन झाले. तब्बल सव्वा वर्षानंतर राज ठाकरे यांचे नाशिक शहरात आगमन झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.आज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्ठांच्या लग्नासाठी राज ठाकरे नाशिक मध्ये आले आहेत. 

राज ठाकरे यांच्या स्वागताला जेष्ठ नेते डॉ.प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतन ईचम, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, शहर अध्यक्ष अंकुश पवार, म.न.वी.से जिल्हा अध्यक्ष शाम गोहाड, शहर अध्यक्ष संदेश जगताप यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते. 

काही वेळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक असून काही दिवसापासून मनसे मध्ये सुरुअसलेल्या अंतर्गत वादावर चर्चा होणार असल्याचे समजते आहे. या बाबत राज ठाकरे (Raj Thackeray) काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे