सर्वात वर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिना निमित्य राज ठाकरेंनी दिला संदेश

१४ मार्च पासून सुरू होणार ऑनलाईन सभासद नोंदणी 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापनदिन आज जरी साजरा होत असला तरी वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर आज ऑडिओ द्वारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. 

या संदेशात कार्यकर्त्यांना भेट होऊ न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  गर्दी टाळणे गरजेचे आहे असे ही त्यांनी नमूद केले.सर्वांनी आपली काळजी घ्यावी असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे. 

१४ मार्च पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी सुरु होणार असून त्याचा शुभारंभ राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.सभासद नोंदणी मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.त्याचे ओळखपत्र राज ठाकरे यांच्या स्वाक्षरी सह सभासदांना ताबडतोब मोबाईल वर मिळणार आहे. 

काय आहे राज ठाकरेंचा संदेश