सर्वात वर

संजु आणि रणजीतची पुन्हा बांधली जाणार लग्नगाठ !

मुंबई : कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेत राजा रानीचा सुखी संसार मोडणार की काय असे वाटत असतानाच रणजीतने एक निर्णय घेतला आहे.मालिकेत संजीवनी आणि रणजीतच्या आयुष्यात आलेल्या संकटाना ते दोघे मिळून सामोरी गेले.आणि त्यांनी एकमेकांची साथ देखील सोडली नाही.घराची प्रतिष्ठा आणि वडिलांकडून मिळालेल्या धमकीमुळे रणजीतपासून लपवलेले तिच्या वयाचे सत्य अखेर ढालेपाटील कुटुंबासमोर आले.संजु आणि रणजीत यांच संपूर्ण आयुष्यात यामुळे खूप बदललं.हे कळल्यानंतर संपूर्ण ढाले पाटील कुटुंबाची अब्रू धुळीला मिळाली.रणजीतला या सगळ्या घडल्या प्रकारामुळे खूप मोठा धक्का बसला. या प्रकरणामुळे संजुने रणजितचा विश्वास पुर्णपणे गमावला.संजु रणजीतने त्यांचे मूल देखील गमावले.ते एकमेकांपासून दुरावले यामुळे राजा रानीचा सुखी संसार मोडणार की काय असे वाटत असतानाच रणजीतने एक निर्णय घेतला आहे आणि आता त्यामुळेच संजु रणजीतची लग्नगाठ पुन्हा बांधली जाणार आहे.

देवाच्या कृपेने संजुला पुन्हा एक संधी मिळाली आहे, दैवाने संजीवनीचा हात रणजीतच्या हाती दिला आहे आता हे दोघे कसे नियतीवर मात करून रानीचा संसार करतील ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेहा विशेष भाग प्रेक्षकांना रविवार ६ डिसेंबरच्या महाएपिसोड मध्ये कलर्स वाहिनीवर बघायला मिळणार आहे.