सर्वात वर

राम्बुतान फ्रुट -(आहार मालिका क्र – १६)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

विदेशी फळफळावल मध्ये आज आपण राम्बुतान फ्रुट (Rambutan Fruit) ची माहीती पाहूयात.nephelium lappaceum नावाने ओळखला जाणारा हा विदेशी पाहुणा मूळचा इंडोनेशिया मधील आणि आता ,आफ़्रिका,मेक्सिको,पनामा,मलेशिया,ऑस्ट्रेलिया ,थायलंड आणि आता तर भारतातही या पाहुण्याने लागवडीसह ठाण मांडले आहे.भारतात दक्षिण केरळ,तामिळनाडू,कर्नाटकात या फळाची लागवड केली जाते.

लाल रंगाचे लाल कधी पिवळ्या केसांचे हे फळ आतमधून गर पांढरा व रसाळ गराचे असते .आंबट गोड चवील असलेले हे फळ पृष्ठभागावर काटेरी केसांसार्खे आवरण असल्याने राम्बुतान (Rambutan Fruit) नावाने ओळखले जाते.मलाया भाषेत राम्बु म्हणजे केस.या फळाचे जाम,जेली देखील बाजारात उपलब्ध आहेत.अश्या या राम्बुतान फळाची माहीती बघूयात.

१.या फळात जीवनसत्व ब च्या ग्रुप पैकी बी १,२,३,६,९ विपुल मिळते,याशिवाय जीवनसत्व क चा यामध्ये उपस्थिती मिळते.याव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज, पोटॅशिअम, सोडिअम,जस्त,ताम्र मिळते.गॅलीक ऍसिड हे ऍन्टीऑक्सिडन्ट मिळते.

२.हे फळ तृष्णा शामक,शक्ती प्रदान करणारे आहे

३.या फळाच्या बीयांचे चूर्ण रक्त शर्करा नियंत्रीत करण्याकरीता वापरतात.

४.ताप असताना याचे पाने व मुळे याचा काढा देतात.ताप असतान या पानांचा वाळवून पाण्यात उकळवून पाणी गार करून पिण्यास वारंवार देतात.

५.रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशींचे प्रमाण वाढवण्यास या फळाचा उपयोग होतो.

६.आयुर्वेदानुसार हे फळ ज्वरघ्न,जंत कमी करणारे,रक्त शुध्द करणारे.केसांना पोषण प्रदान करणारे आहे.

७.अतिसार जुलाब या आजारा मध्ये हे फळ गुणकारी ठरते.

८.या फळाचा गर त्वचेवर कुस्करून लावल्यास त्वचा मुलायम होते.

९.फळाच्या सेवणाने केस गळणे,पांढरे होणे,या समस्या कमी होण्यास हळू हळू सुरुवात होते.

१०.लहान मुलांच्या जंत विकारांवर हे फळ गुणकारी असल्याचे संशोधनात सिध्द झले आहे .

११.फळातील योग्य लोहाच्या प्रमाणाने शरीरातील थकवा दूर होतो,रक्ताचे योग्य पोषण होते.

१२.आयुर्वेदानुसार रस धातु,रक्त धातु वाढवण्यास या फळाचा उपयोग चांगला होतो.

१३.शरीरातील निरुपयोगी घटक दूर करण्यासाठी या फळाचा योग्य तो उपयोग होतो.

१४.फळापासून योग्य प्रमाणात कॅल्शिअम मिळते.रात्री पायांत गोळे येवून पाय दुखण्याच्या तक्रारींमध्ये याचा उपयोग होतो.

१५.राम्बुतान फळाचा केस उपचारांकरीता वापर बाहेरील देशात मोठ्या प्रमाणावर होतो.

निषेध
फळ दूधासह खाण्यास वापरू नये.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी 


संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०