सर्वात वर

रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरण : नवव्या आरोपी कडून ६३ इंजेक्शनचा जप्त

नाशिक – नाशिक मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Ramdesivir) तुटवडा असतांना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पोलीस तपासात दररोज नवनवीन माहिती उघडकीस येत आहे.पोलिसांनी आता नवव्या आरोपीस पालघर जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याच्या कडून तब्बल ६३ रेमडेसिवीर (Ramdesivir)इंजेक्शन जप्त केले आहेत.

पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री ११ वाजेदरम्यान के. के. वाघ कॉलजेजवळ राज्यात पहिल्यांदाच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तरुणींच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये तीन नर्स व एका फार्मासिस्टचा समावेश आहे. त्यांनतर पोलिसांनी आणखी चौघांना पालघर जिल्ह्यातून अटक करत २० रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले. आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ जणांकडून एकूण ८५ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. 

आडगाव पोलीसांनी नाशिक व  पालघर जिल्हयातुन १) रोहीत मुठाळ नाशिक, २) महेश पाटील वसई जि. पालघर ३) अभिषेक शेलार वाडा जि. पालघर ४) सुनिल गुप्ता, विरार जि. पालघर असे ८ संशयीतांना ताब्यात घेवुन अटक करून त्यांच्या तपासा दरम्यान आरोपी सिध्देश अरुण पाटील रा. पालघर हा त्याचेकडुन काळयाबाजारात विक्रीस असलेले एकुण १,८९,०००/- रूपये किंमतीचे ६३ रेमडीसीवीर(Ramdesivir) इंजेक्शन पैकी ६२ लेबल व ९ कंपनीचे लेबल असलेले रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. दीपक पाण्डे , पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. अमोल तांबे सो सपोआ/ विभाग- १ श्री. गायकवाड सो. यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. इरफान शेख आडगाव पोलीस स्टेशन यांचे आदेशान्वये सपोनि / श्री. हेमंत तोडकर, पोउनि राजेंद्र कपले, पोहवा सुरेश नखडे, भास्कर वाढवणे, विजयकुमार सुर्यवंशी, दशरथ पागी, राकेश बनकर, पोकॉ. सचिन बाहिकर, वैभव परदेशी, विश्वास साबळे, देवानंद मोरे, अशांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउनि / श्री. राजेंद्र कपले हे करीत आहेत.