सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१९ डिसेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहूकाळ- सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्रनक्षत्र :’धनिष्ठा’ (संध्याकाळी ७.४० पर्यंत) आज चांगला दिवस आहे.

मेष:-येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा राहील.

वृषभ:- कामाच्या ठिकाणी वजन राहील. विरोधक नामोहरम होतील. मन प्रसन्न राहील.

मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची आज काळजी घ्या.

कर्क:- वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा.

सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. स्पर्धेत विजय तुमचाच होईल. नेतृत्वगुण सिद्ध होईल.

कन्या:- आर्थिक प्राप्तीसाठी अतिउत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल.

तुळ:- कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल.

वृश्चिक:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. गुप्तशत्रू त्रास देतील. कमी बोलणे हिताचे आहे.

धनु:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. धनलाभ होणार आहे. आळस झटकून कामाला लागा.

मकर:- खर्चात वाढ होणार आहे. उगाच मनाला लावून घेऊ नका. ध्यान धारणा करा.

कुंभ:- मेजवानी मिळेल. गुप्तशत्रूपासून दूर रहा. स्पष्ट भूमिका घ्याल. श्री. हनुमान उपासना अत्यावश्यक आहे. 

मीन:- खर्चात वाढ होणार आहे. त्याची भरपाई नंतर होईल. मन शांत ठेवा. क्रोध आवरा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली