सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार ,२० डिसेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००”आज चांगला दिवस, चंपाषाष्टी, मार्तंड भैरवउत्थापन, स्कंद षष्ठी आहे.” 
चंद्रनक्षत्र – शततारका (रात्री ९.०१ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दीर्घकालीन लाभाचे करार होतील. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वैर निर्माण होईल. शांतता राखा. संयम ठेवा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामानिमित्त भ्रमंती करावी लागेल. मन अस्वस्थ राहील. अचानक धनलाभ संभवतो. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. मन शांत ठेवा. फार काळजीचे कारण नाही.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गैरसमज होऊ देऊ नका. घरात शांतता राखा.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल. मन शांत ठेवा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वैरभाव निर्माण होऊ देऊ नका. कामात अडथळे येतील. घरात लक्ष द्यावे लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मन आनंदी राहील. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्चात वाढ होते आहे. आर्थिक नियोजन काटेकोर करा. अनामिक भीती दाटून येईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन अस्वस्थ राहील. उपासना केल्यास चांगले फळ मिळेल. अध्यात्मिक लाभ होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. सध्या नवीन काही सुरूवात नको..

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)