सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,६ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today –ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० 
आज क्षयदिन आहे.
चंद्र नक्षत्र – अनुराधा (संध्याकाळी ५.१८ पर्यंत)

मेष:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. महत्वाचे करार आज नकोत. श्री.शनी उपासना लाभदायक ठरेल.       

वृषभ:- जोडीदाराशी वाद होऊ शकतात. संशयकल्लोळ टाळा. भागीदारी व्यवसायात काळजी घ्या. 

मिथुन:- चांगले आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 

कर्क:- संमिश्र दिवस आहे. अपत्यांकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. स्पर्धेत यश मिळेल.  

सिंह:- विनाकारण वादविवाद टाळा. वेळेचे महत्व जाणून घ्या. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.  

कन्या:- उत्तम आर्थिक लाभ मिळतील. मना सारखी कामे होतील. दिवस आनंदात व्यतीत कराल.  

तुळ:- आर्थिक व्यवहार अतिशय जपून करा. खर्चात टाकणारा दिवस आहे.   

वृश्चिक:- अनामिक भय दाटून येईल. आत्मविश्वास कमी होईल. मात्र लवकरच परिस्थिती बदलेल. 

धनु:- फारसा दिलासादायक कालावधी नाही. मात्र तुम्ही सहजपणे मार्गक्रमण कराल. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल. 

मकर:- उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. आर्थिक येणे वसूल होईल. 

कुंभ:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. दगदग वाढेल. संयम बाळगा.   

मीन:- अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक करा. शुभ सूचक घटना घडतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)