सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,२४ डिसेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी (अहोरात्र) -Rashi Bhavishya Today

मेष:- विंचू काट्याचा धोका संभवतो. व्यसने प्रलोभने टाळा. आरोग्य सांभाळा.     

वृषभ:- शत्रूंचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. आज महत्वाची कामे नकोत.  

मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. लॉटरीतून लाभ होतील.

कर्क:- अशुभ घटनांचे सावट आहे. व्यसने त्रासदायक ठरतील. उपासना लाभदायक ठरेल. 

सिंह:- आज हातून चुकीच्या गोष्टी घडू शकतात. काळजी घ्या. सरकारी कायदे कसोशीने पाळा.  

कन्या:- अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. चुकीची औषध योजना होणार नाही याची काळजी घ्या. 

तुळ:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल.  

वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा.

धनु:- सौख्य लाभेल. नियोजित कार्यक्रमात बदल करावे लागतील मात्र त्यातून लाभ होतील. 

मकर:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. श्री. हनुमान उपासना करा. 

कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील. 

मीन:- जुने शत्रू आज डोके वर काढतील. तूर्त शांत राहणे हिताचे आहे.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today- कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली