
आजचे राशिभविष्य गुरूवार, ४ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज संध्याकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे.बुध मकर राशीत वक्री होत आहे.
चंद्र आज राहूच्या ‘स्वाती’ नक्षत्रात तुळ राशीत आहे.
मेष:- दूरगामी परिणाम करणारे निर्णय होतील. भागीदारी व्यवसायात वाद निर्माण होऊ शकतात.
वृषभ:- आर्थिक फायदा होईल. दीर्घकाळ लाभ देणारे निर्णय घ्याल. घरातील महत्वाची कामे आज पूर्ण करा.
मिथुन:- स्पर्धेत यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. जवळचे प्रवास घडतील.
कर्क:- गृहसौख्य लाभेल. जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. विनाकारण वाद होतील.
सिंह:- धनलाभदायक दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. कौतुक होईल.
कन्या:- खर्चात वाढ होईल. विनाकारण त्रास संभवतो. मन शांत ठेवा.
तुळ:- आत्मविश्वास वाढेल. कामात मन रमेल. बौद्धिक कामातून आनंद मिळेल.
वृश्चिक:- चुका टाळा. सरकारी कायदे काटेकोर पाळा. अशुभ समाचार येऊ शकतो. उपासना करा.
धनु:- उत्तम दिवस आहे. दबदबा वाढेल. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल.
मकर:- मान सन्मान वाढेल. जबाबदारीत भर पडेल. वाद संभवतात. शांत रहा.
कुंभ:- अचानक धनलाभ संभवतो. भाग्य उजळेल. जेष्ठ नातलगांकडून फायदा होईल.
मीन:- आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. महत्वाचे काम आज नको. संयम बाळगा.

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
