सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य गुरूवार,४ मार्च २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज अनिष्ट दिवस आहे.” 
नक्षत्र – विशाखा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कुटुंबास वेळ द्याल. धार्मिक कामात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) फारसा अनुकूल दिवस नाही. मन स्थिर ठेवा. उपासना करा. महत्वाची कामे आज नकोत. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामात अडथळे आले तरी तुम्ही आज वेगळे नियोजन करून लाभ मिळवू शकाल. प्रसन्न वाटेल. आनंदी राहाल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) खर्चात वाढ होऊ शकते. आरोग्यावर खर्च होईल. घरात काही बदल कराल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. तरीही एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. उपासना केल्यास सौख्य लाभेल.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) धनलाभ होईल. मन आनंदी राहील. समाधानकारक कामे होतील.   

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनामिक भीती दाटून येईल. मन अस्थिर राहील. विचारपूर्वक कामे करा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पीडादायक दिवस आहे. फार महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. मन अस्थिर राहू शकते.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ चांगले होत आहेत. अंदाज अचूक ठरतील. स्पर्धेत यश मिळेल.   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. फारसा अनुकूल नाही. नियमित कामे चालू ठेवा. नवीन सुरुवात आज नको.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गुरू सन्निध मिळेल. आध्यत्मिक अनुभूती येईल. मन शांत राहील. सौख्य लाभेल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) हातून अधार्मिक कामे घडणार नाहीत याची काळजी घ्या. नियमित कामे चालू ठेवा. महत्वाचे करार आज नकोत.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square