सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,३० मार्च २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज उत्तम दिवस, *संत तुकाराम महाबीज* आहे”
चंद्र नक्षत्र – चित्रा (दुपारी १२.२२ पर्यंत)

मेष:- आवडत्या व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराशी वाद टाळा.     

वृषभ:- उत्तम यश मिळेल. कामे मार्गी लागतील. कठोर निर्णय घ्याल. 

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.

कर्क:- मुत्सद्दी बना. हितशत्रू डोके वर काढतील. मात्र विजय तुमचाच होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.  

कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. घाईने निर्णय नकोत. जोडीदार प्रतिष्ठा सांभाळेल. 

तुळ:- आत्मविश्वास वाढेल. नेमकी भूमिका घ्या. कामात दगदग होईल. कमी बोला. 

वृश्चिक:- खर्च वाढवणारा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. कायदेशीर कामात यश मिळेल.

धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. 

मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. छोटे प्रवास घडतील.   

कुंभ:- सौख्य लाभेल. नात्यातून लाभ होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. कोर्टात यश मिळेल. 

मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. आराम करा. वाहने जपून चालवा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)