सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य मंगळवार,९ मार्च २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
चंद्रनक्षत्र:-  ‘उत्तराषाढा’ (संध्याकाळी ८.४१ पर्यंत)
आज चांगला दिवस, विजया एकादशी आहे.

मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. कार्यकर्तृत्व सिद्ध होईल.       

वृषभ:- कठोर बोलणे टाळा. व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल. 

मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.

कर्क:- अडचणीतून मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल. 

सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील.  

कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद होतील. कामात अडथळे येतील. उपासना करा.  

तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. कला प्रांतात चमक दाखवाल. 

वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल. 

धनु:- अनामिक भीती निर्माण होईल. आर्थिक नियोजन करा. खर्चात वाढ होईल. प्रिय व्यक्तींची भेट होईल. 

मकर:- संमिश्र ग्रहमान आहे. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.   

कुंभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. कुलदेवतेचे स्मरण आणि ध्यानधारणा लाभदायक ठरेल.  

मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे.  वेळ दवडू नका. उत्साह वाढेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521.)

बातमीच्या मध्ये
Ac square