सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,१० मार्च २०२१

Rashi Bhavishya Today  – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे. दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे. प्रदोष आहे. 

मेष:- दिवस मजेत जाईल. कामाच्या ठिकाणी हलके फुलके वातावरण असेल.     

वृषभ:- गूढ स्वप्ने पडतील. अज्ञात व्यक्तीकडून लाभ होईल. सूचक घटना घडतील. 

मिथुन:- मन अस्वस्थ राहील. काळजी वाढेल मात्र लवकरच परिस्थिती बदलेल. उपासना लाभदायक ठरेल.

कर्क:-  प्रेमात पडाल. मनपसंत जोडीदार लाभेल. विवाहित व्यक्तींना दिवस आनंदाचा जाईल. 

सिंह:- आर्थिक आवक चांगली होत राहील. नवीन कामे येतील. मन प्रसन्न राहील.  

कन्या:- मुलांशी संवाद साधा. धाडसी निर्णय घ्याल. नवीन कल्पना सुचतील. 

तुळ:- तब्येत सांभाळा. शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज आहे. 

वृश्चिक:- दिवस मजेत जाईल. काळजी करण्याचे कारण नाही. आर्थिक आवक चांगली राहील.

धनु:- खर्चात वाढ होईल मात्र काळजी नको. व्यवसायवृद्धी होईल. कला प्रांतात सहभागी व्हाल. 

मकर:- मन प्रसन्न राहील. दिवस आनंदात घालवाल. आत्मविश्वास वाढेल. 

कुंभ:- संवेदनशीलता वाढेल. भावनांचा कल्लोळ होईल. आत्ममग्न व्हाल. 

मीन:- आर्थिक आवक वाढेल. मनासारखी कामे होतील. प्रसन्न दिवस आहे.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)