सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,१५ डिसेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: मूळ (रात्री ९.३१ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक धनलाभ  होतील. गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल. दूरचे प्रवास संभवतात.           

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्य सांभाळा. विंचू काट्याचे भय आहे. वाहने जपून चालवा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. कामानिमित्त धावपळ होईल. विजयी घोडदौड चालू राहील. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. शेअर्स मधून लाभ होतील.   

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. अपत्य संबंधित शुभ समाचार समजतील.   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मानसिक सौख्य लाभेल. मौल्यवान खरेदी कराल. उपासनेचे चांगले फळ मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल.  संपत्तीत वाढ होईल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारसा अनुकूल कालावधी नाही. खर्चात वाढ संभवते. विनाकारण वाद विवाद होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. सावकाश वाटचाल करा. महत्वाचे करार आज नकोत.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मानसिक आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. मात्र ग्रहांची साथ चांगली मिळत आहे. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल.आनंदी राहाल. अनुकूल रवी प्रतिष्ठा सांभाळेल.  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वरिष्ठ नाराज होतील. विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)