सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य बुधवार,२१ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०”आज चांगला दिवस, राम नवमी आहे. ” 
नक्षत्र – पुष्य( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521) 
.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. हितशत्रू त्रास देतील. मन शांत ठेवा. उपासना करा.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची शांतता ढळू देऊ नका. कमी बोला.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) विनाकारण मन अस्वस्थ राहील भय दाटून येईल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सरकारी कामातून त्रास होऊ शकतो. मनाची अवस्था प्रतिकूल आहे. हुरहूर जाणवेल. तत्वाने वागा.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. दीर्घकालीन लाभाचे विचार होतील.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पूर्वार्ध अनुकूल आहे. सौख्य लाभेल. मात्र नात्यात दुरावा निर्माण  होऊ शकतो.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) हातून चूक घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ नाराज होतील. राजकारणात अपयश मिळेल. 

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. पीडा दायक अनुभव येऊ शकतात. उपासना केल्यास नक्कीच लाभ होतील. आरोग्य संभाळा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दोषारोप होऊ शकतात. महिलांकडून त्रास संभवतो. सोबत काम करण्याऱ्या व्यक्तीकडून मानसिक त्रास होऊ शकतो.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे. नवीन कल्पना सुचतील. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)कामात अडथळे येत आहेत. स्पर्धेत पराभव होऊ शकतो. अधिक मेहनत घ्या. निराश होऊ नका. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Ac square