सर्वात वर

क्रेडाई नाशिक मेट्रो च्या अध्यक्षपदी रवी महाजन यांची फेरनिवड

नाशिक – बांधकाम व्यवसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोची (Credai Nashik Metro) २०२१-२२ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या वर्षासाठी अध्यक्षपदी रवी महाजन यांची फेरनिवड करणात आली आहे . त्यांच्या सोबत उपाध्यक्ष पदी नरेश कारडा व कृणाल पाटील तर मानद सचिव म्हणून गौरव ठक्कर तसेच कोषाध्यक्षपदी हितेश पोतदार  यांची देखील निवड करण्यात आली आहे .क्रेडाई नाशिक मेट्रोचे  माजी अध्यक्ष तसेच  राष्ट्रीय क्रेडाई चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर  व राष्ट्रीय क्रेडाई च्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख जितुभाई ठक्कर तसेच अन्य माजी अध्यक्ष यांच्या  समितीने ही निवड केली .

गत वर्षात अध्यक्ष रवी महाजन यांच्या नेतृत्वामध्ये कोविड  च्या वैश्विक संकट समयी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे नाशिक शहरामध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले होते. ठक्कर डोम येथे उभारलेले कोविड केअर सेंटर हे राज्यातील उत्कृष्ट सेंटर ठरले होते . बांधकाम व्यवसायासाठी युनिफाईड डी सी पी आर लागू करण्यात आल्याने त्या बाबत संबंधित साठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील रवी महाजन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.

आपल्या आगामी वर्षाच्या योजनेबाबत बोलताना ते म्हणाले की नाशिक शहर विकसित होण्यासाठी अन्य संस्था व शासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे . तसेच नाशिक मध्ये नवे उद्योग  व  गुंतवणूक  येण्यासाठी देखील क्रेडाई नाशिक मेट्रो (Credai Nashik Metro) तर्फे प्रयत्न केले जातील . शहराचे ब्रांडीग व सौंदर्यवृद्धी साठी क्रेडाई नाशिक मेट्रो विशेष प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. 

 क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल यांनी नूतन कार्यकारिणीस मार्गदर्शन करताना ही कार्यकारिणी नाशिक च्या विकासात सकारात्मक योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला.

क्रेडाई नाशिक मेट्रोची (Credai Nashik Metro) कार्यकारिणी अशी

अध्यक्ष – रवी महाजन, माजी अध्यक्ष – उमेश वानखेडे , उपाध्यक्ष-  नरेश कारडा  व कृणाल पाटील , मानद सचिव- गौरव ठक्कर, सहसचिव -अनिल आहेर व सचिन बागड , कार्यकारिणी सदस्य – मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया ,अतुल शिंदे, सुशील बागड , राजेश आहेर , हंसराज देशमुख , श्रेणिक सुराणा .निमंत्रित सदस्य –नरेंद्र कुलकर्णी, सागर शाह, अनंत ठाकरे ,विजय चव्हाणके .