सर्वात वर

मक्याची डाळ

शीतल पराग जोशी 

यासाठी आपण साधे कॉर्न किंवा स्वीट कॉर्न वापरू शकतो. स्वीट कॉर्न भेळ आपण नेहेमीच खातो. पण अशी डाळ खूप सुंदर लागते. जास्त मटेरियल लागत नाही. इंदोरला अशी मक्याची डाळ (Makyachi Dal) चाट सेन्टरला मिळते.

साहित्य: 4 स्वीट कॉर्न कणीस किंवा दाणे, 2 मिरची, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, अर्धी वाटी ओला नारळ किस, 2 टीस्पून कोथिंबीर, 1 लिंबू, मीठ

कृती: स्वीट कॉर्न किंवा साधे कॉर्न किसणीवर किसून घ्यावे. दाणे असल्यास मिक्सरला जाडसर फिरवून घ्यावे. पाणी टाकू नये. नंतर एक कढई घेऊन त्यात तेल टाकावे. त्यात जिरे, मोहोरी टाकावी. ते तडतडले की त्यात मिरची, हिंग, हळद टाकावे. नंतर हा मक्याचा किस टाकावा. चांगले परतून घ्यावे. पाणी टाकू नये. त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. काही जण यात दूध घालतात. झाकण काढून परत एकदा परतवून घ्यावे. छान कोरडे झाले की त्यावर लिंबू पिळायचा. मीठ घालायचे.बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.ओले नारळ घालायचे. आणि सर्व्ह करताना एका डिशमध्ये  मक्याची डाळ (Makyachi Dal) वाटीने मुदिसारखी ठेवावी. त्यावर कोथिंबीर, नारळ किस घालावा. लिंबू पिळावे.

अशी ही खमंग डाळ खूप छान लागते. रोजच्या खाण्यात जरा चेंज चांगला वाटतो. याला भुट्टे का किस, पण म्हणतात.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२