सर्वात वर

आलू पनीर लच्छा पराठा

शीतल पराग जोशी 

Aloo Paneer Lachcha Paratha

साहित्य:1 वाटी कणिक, 1 टीस्पून ओवा, 1 चमचा तेल, मीठ, 3 उकडलेले बटाटे, 2 चमचे आले, मिरची पेस्ट,1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 कांदा, 1 मिरची, 1 चमचा कोथिंबीर, 1 cube पनीर, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून चाट मसाला, 1 चमचा कोथिंबीर,तूप अथवा बटर, दही

कृती:  गव्हाचे पीठ घेऊन त्यात ओवा, मीठ, तेल टाकावे. पाण्याने घट्टसर कणिक भिजवून 20 मिनिट ठेवून द्यावी


सारण: उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यावेत. त्यात आले, मिरची पेस्ट घालावी. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची घालावी. त्यात कीसलेले पनीर, कोथिंबीर, धणे, जिरे पावडर, तिखट, चाट मसाला घालून चांगले कालवून सारण तयार करावे.

कणकेचा एक गोळा घेऊन तो पोळी इतका लाटून घ्यावा.

त्यावर तूप अथवा पातळ बटर लावावे. आपण जे सारण बनवले आहे ते पूर्ण पोळीवर पसरवून घ्यावे. नंतर त्या पोळीची वरून गुंडाळी करत जावी. परत याला ब्रशने बटर लावावे. कारण पंजाबी लोक तूप अथवा बटर खूप वापरतात.आपण गुंडाळी बनवली की ते जिलबिप्रमाणे गोल गुंडाळत जावी.  परत हयलाला बटर लावावे. ह्याप्रमाणे तयार झालेला गोळा हलक्या हाताने लाटून घ्यावा.  तवा गरम करण्यास ठेवून त्यावर तूप अथवा बटर ब्रशने लावून घ्यावे.असा हा लाजवाब पराठा तव्यावर टाकावा. दोन्हीं बाजूने छान शेकून घ्यावा. गुलाबीसर रंग आला के अजून बटर सोडावे. त्या पराठ्याचे एक एक पदर सुटे होतात. आणि तो मस्त कुरकुरीत होतो. डिशमध्ये पराठा (Aloo Paneer Lachcha Paratha) काढून घ्यावा.

नंतर असा हा अलु पनीर लच्छा पराठा (Aloo Paneer Lachcha Paratha) दह्याबरोबर सर्व्ह करावा.लहानापासून मोठ्यांपर्यंत असा हा पौष्टिक पराठा सगळ्यानाच आवडतो.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२