
भरले कांदे

शीतल पराग जोशी
साहित्य : 10 छोटे कांदे,शेंगदाणे कूट अर्धी वाटी, 2 चमचे तिखट, 1चमचा गरम मसाला, 1चमचा कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून जिरे, 7 लसूण पाकळ्या, 1 चमचा तीळ, तेल, 1 टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, मीठ
कृती : छोटे कांदे घ्यावेत. वरचे साल काढून टाकावे.त्याला वांग्याप्रमाणे उभ्या 2 चिरा पाडून घ्याव्यात. मसाला: दाणेकूट, तीळ,तिखट,मसाला,लसूण, जिरे, मीठ सगळे मिक्सरला बारीक करून घ्यावे. पाणी टाकू नये. नंतर हा मसाला कांद्यामध्ये भरून घ्यावा. नंतर एक पॅन घेउन त्यात तेल टाकावे. जिरे, मोहोरी तडतडले की हिंग घालावे. हळद घालावी. नंतर हे मसाला भरलेले कांदे, आणि उरलेला मसाला टाकून चांगले हलवून घ्यावे. त्यात पाणी घालावे. खूप पाणी टाकू नये.ग्रेव्ही कांद्याबरोबर असली पाहिजे. नंतर थोडे मीठ घालावे. एक शिटी झाली की गॅस बंद करावा. खूप शिजवू नये. असे भरले कांदे खूप मस्त लागतात.
सध्या उन्हाळा चालू आहे. त्यामुळे कांदा भरपूर खावा. पांढरा कांदा तर खूपच छान असतो.कांद्याने अंगातील उष्णता कमी होते.असे हे भरले कांदे, गरमागरम भाकरी बरोबर खावे. खूप छान लागतात. मग करून बघा ना.

संपर्क-संपर्क-९४२३९७०३३२
