सर्वात वर

भोपळ्याचे घारगे

शीतल पराग जोशी 

Bhoplyache Gharg

साहित्य: 2 वाट्या लाल भोपळयाच्या फोडी, दीड वाटी गूळ, मावेल एवढी कणिक, 1 टीस्पून मीठ, तेल

कृती: प्रथम लालभोपळ्याची साले काढून घ्यावीत. नंतर त्याच्या मोठ्या फोडी करून त्या एका पातेल्यात शिजवून घ्याव्यात. गूळ चिरून घ्यावा. फोडी शिजल्या की त्या ताटात काढून गरम असतानाच त्यात गूळ घालावा. म्हणजे गूळ वितळतो. नंतर त्यात मीठ आणि थोडे तेल घालावे. आणि त्यात मावेल एवढी कणिक घालावी. काहीजण यात तांदूळ पीठ पण घालतात. तुम्हाला आवडत असेल तर घाला. हे  घारगे गोडच हवेत. कणिक घट्टच मळावी. नंतर एक कढई घेऊन त्यात तेल तापण्यास ठेवावे.  कणकेचे छोटे गोळे घेऊन जाडसर पुऱ्या लाटाव्यात. खूप बारीक करू नये.असे हे घारगे मस्त गुलाबीसर तळून घ्यावे. साजुक तुपाबरोबर किंवा ताज्या लोणच्याबरोबर हे घारगे (Bhoplyache Gharg) अप्रतिम लागतात. गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. फोडींच्या प्रमाणात गूळ घ्या.

गूळ असल्यामुळे पौष्टिक आहेत. हॅमोग्लोबिन वाढण्यासाठी खुप छान पर्याय आहे. चला मग करून बघा.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२