सर्वात वर

बीटाचे कटलेट

शीतल पराग जोशी 

बीट हे खाण्यास खूप उपयुक्त आहे. बीटाने हिमोग्लोबीन वाढते.त्यात अनेक व्हिटॅमिन्स असतात. आपण बीटाची कोशिंबीर, बीटंबा नेहेमी करतो. आज जरा चटपटीत कटलेट (Betache Cutlets) करून बघू या.अगदी मोजके साहित्य लागते.

Betache Cutlets Recipe
साहित्य: १ बीट, 2 बटाटे, 6 लसूण पाकळ्या, 4 मिरच्या,1 टीस्पून चाट मसाला, थोडी कोथिंबीर, 2 टीस्पून जिरे,  4 ब्रेड स्लाईस, मीठ, 

कृती: प्रथम बीट आणि बटाटे उकडवून घ्यावे. खूप शिजवू नये. नंतर ते थंड होण्यास ठेवावे. लसूण, मिरची, जिरे मिक्सरला फिरवून घ्यावे. नंतर त्यातच ब्रेडचे तुकडे करून ते पण मिक्सरला बारीक करून घ्यावे. बटाटे, बीट किसणीवर किसून घ्यावे. नंतर त्यात लसूण,मिरची, जिरे पेस्ट घालावी. त्यातच ब्रेड क्रश घालावे. थोडा चाट मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालावी. गोळा छान मळून घ्यावा. त्याचे छोटे गोळे घेऊन हाताला तेल लावून कटलेट वा टिक्की बनवावेत. नंतर एक तवा घेऊन त्यावर तेल सोडावे. त्यावर हे कटलेट ठेवावे. दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होऊ द्यावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. एका वेळीं 4 कटलेट ठेवू शकतात. झाले आपले पौष्टिक बीट कटलेट(Betache Cutlets) तयार. हे तुम्ही नुसते पण खाऊ शकतात. किंवा दोन ब्रेड घेऊन त्या स्लाईसला टोमॅटो सौस लावून त्यामध्ये हे कटलेट ठेवू शकतात. आणि मग मस्त खाऊ शकतात. हे कटलेट (Betache Cutlets) गरमच  चांगले लागतात.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

 संपर्क-९४२३९७०३३२