सर्वात वर

ब्रेड रोल

शीतल पराग जोशी 

Bread Roll

साहित्य: 1 मोठा स्लाईस  ब्रेड पॅकेट,7 बटाटे, 1 वाटी मटार दाणे, 1 इंच आले, 7 पाकळ्या लसूण,2 चमचे कोथिंबीर, 5 मिरच्या, लिंबाचा रस, तेल, मीठ

कृती: बटाटे उकडून घ्यावेत. नंतर ते सोलून स्मॅश करून घ्यावे. आले, लसूण , मिरची यांची पेस्ट करावी.  मटार दाणे थोडेसे शिजवून घ्यावे.  तसेच हिरवे राहिले पाहिजे. त्यातील पाणी काढून टाकावे.  एक मोठ्या बाऊलमध्ये स्मॅश केलेले बटाटे, आले,लसूण, मिरची पेस्ट, लिंबूरस, कोथिंबीर, शिजलेले मटार, मीठ घालून एकत्र कालवून सारण तयार करून घ्यावे. ब्रेडच्या स्लाईसच्या कडा कापून घ्याव्यात. एका मोठ्या पसरट पातेल्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालावे. ब्रेडची स्लाईस पाण्यात बुडवून तळहातावर दाबून त्याचे पाणी काढून टाकावे. स्लाइस हातावर ठेवून त्यावर बटाट्याच्या सारणाचा लांबट आकाराचा गोळा तयार करून ठेवावा वरून ब्रेडचा रोल गुंडाळून घेऊन सर्व बाजूनी दाबून पॅक करावा. नंतर कढईत तेल घेऊन हे तयार केलेले ब्रेड रोल गोल्डन रंगावर तळून घ्यावेत. डाएट कॉन्शस  असाल तर रोल तव्यावर थोडे तेल टाकून शॉलो  फ्राय पण करू शकतात. पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर हे ब्रेड रोल(Bread Roll) खाऊ शकतात. हवे असल्यास तुम्ही भाजीत पनीर अथवा चीज किसून घालू शकतात. करा मग झटपट ब्रेड रोल.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२