सर्वात वर

बटर दाल खिचडा

शीतल पराग जोशी 

आपण संध्याकाळी नेहेमी खिचडी, पुलाव करतो. आणि हॉटेलला दाल खिचडा नेहेमी घेतो. तर तो घरच्या घरी केला तर किती छान वाटेल. चला मग करू या बटर दाल खिचडा(Butter Dal Khichda)

साहित्य –1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, 1 कांदा, 7 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या,1 टीस्पून मोहोरी, 1 टिस्पून जिरे, 1 टिस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, 2 टिस्पून तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला, तेल, बटर, मीठ

कृती:प्रथम कुकरमध्ये नेहेमीप्रमाणे वरण भात करतो त्याप्रमाणे करून घ्यावा. ते थंड  करून घ्यावे. कुकर मध्ये तेल आणि थोडे बटर घालावे. मोहोरी, जिरे  तडतडले की हिंग घालावा. नंतर त्यात कांदा, ठेचलेला लसूण घालावा. टोमॅटो घालावा. मिरचीचे बारीक  तुकडे घालावे. नंतर त्यात  हळद, तिखट, दोन्ही मसाले घालावेत. आणि मस्त परतवले की त्यात डाळ पातळ करून घालावी. भात मोकळा करून घालावा. त्यात गरम पाणी घालावे. मीठ आणि कोथिंबीर टाकून 2 शिट्ट्या करून घ्याव्यात. थोडा पातळ सरच असला पाहिजे. झाला आपला गरमागरम दाल खिचडा तयार. प्लेट मध्ये सर्व्ह करताना दाल खिचडा, त्यावर बटर आणि थोडी कोथिंबीर घालावी. त्याबरोबर लोणचे, पापड खाऊ शकतात. काय मग करून बघा नक्की बटर दाल खिचडा (Butter Dal Khichda)

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२