सर्वात वर

चना चाट

शीतल पराग जोशी 

आपण अनेक प्रकारच्या चाट करतो. पण ही हटके चना चाट (Chana Chaat)करून बघा एकदा. साहित्य पण कमी लागते. 

Chana Chaat Recipes

साहित्य: 1 किंवा 2 वाटी काबुली चणे , 1 मोठा कांदा, 2 टोमॅटो, 1 लिंबू, 2 टीस्पून तिखट, 2 टीस्पून चाट मसाला, 2 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर, मीठ, बारीक शेव

कृती: आदल्या दिवशी चणे भिजत घालावेत. काहीजण भिजवताना सोडा घालतात. दुसऱ्या दिवशी चणे काढून ते कुकर मध्ये शिजवून घ्यावेत.थोडे मीठ घालावे. पाणी कमी घालावे.खूप गाळ नको. पण शिजले पण पाहिजे.  तीन किंवा चार शिट्ट्या करा. आता एका बाऊल मध्ये चणे घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची घालावी. तिखट, चाट मसाला, थोडे मीठ घालावे. चांगले कालवले की त्यात लिंबूरस घालावा. वरून कोथिंबीर आणि बारीक शेव घालून मस्त फ्रेश खाण्यास द्यावी. अशी ही चना चाट (Chana Chaat) पौष्टिक आहे. शिवाय तेलाचा बिलकुल वापर नाही. करा मग आणि मला सांगा कशी झाली ते.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२