सर्वात वर

चटकदार कढी गोळे

शीतल पराग जोशी 

हा खास खान्देशी पदार्थ आहे. जेव्हा आपल्या कडे भाजी नसते, त्यावेळी घरच्या पदार्थापासून असे कढी गोळे(Chatakdar Kadhi Gole) आपण करू शकतो.चला मग मस्त खा.आणि खाऊ घाला.

साहित्य: 4 वाटी आंबट ताक, दिड वाटी चणा डाळ, 10 लसूण पाकळ्या, 5 मिरच्या, 1इंच आले, 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग, 1 टिस्पुन मेथी दाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहोरी, जिरे, तेल, तूप


कृती: आदल्या दिवशी डाळ धुवून भांड्यात भिजत घालावी. दुसऱ्या दिवशी डाळ कोरडी जाडसर वाटावी.वाटताना त्यात लसूण, आले, मिरची,कोथिंबीर घालावी. वाटून झाले की त्यात तिखट, मीठ, हळद, हिंग घालावे. चांगले कालवून घ्यावे. त्याचे लहान गोळे तयार करावेत. एका भांड्यात पाणी घेऊन त्याला उकळी आली की त्यात हे गोळे सोडावेत. गोळे शिजले की ते वर येतात.गोळे शिजले की ते काढून घ्यावेत.


कढी: ताक घेऊन त्याला किंचीत डाळीचे पीठ लावावे. नाही लावले तरी चालते. पातेल्यात तेल किंवा तूप घालावे.तापल्यावर त्यात मोहोरी, जिरे, मेथी दाणे, हिंग, हळद,कढीपत्ता,थोडे किसलेले आले घालून हे ताकाचे मिश्रण घालावे. कढीला उकळी आली की हे शिजलेले गोळे त्यात घालावे. मीठ, कोथिंबीर घालावी. मस्त कढी गोळे तयार होतात.


गोळे आधी शिजवायचे नसतील तर उकळत्या कढीत गोळे सोडावेत. नंतर एक छोट्या कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहोरी, हिंग घालून लसूण बारीक चिरून घालावा.लसूण लाल झाला की गॅस बंद करावा.अशी ही फोडणी गरमागरम गोळे कुस्करून त्यावर घालावी.  थोडे तिखट गोळ्यावर वरून घालावे. मस्त पोळी किंवा भाकरीबरोबर हे कढी गोळे(Chatakdar Kadhi Gole) खावेत. 


टीप: गोळे जर फुटत असतील त्यात थोडे बेसन घाला. म्हणजे गोळे फुटणार नाहीत.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२