सर्वात वर

दाल पिठा

शीतल पराग जोशी 

साहित्य:-(Dal Pitha) 1 वाटी कणिक, 2 चमचे साजूकतूप, मीठ, 1 वाटी तूर डाळ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, 1टीस्पून जिरे, 2 चमचे हिरवी मिरची, 1चमचा आले, लसूण पेस्ट, 2 चमचे तिखट,तेल, मीठ, कोथिंबीर

कृती: तूरडाळ स्वच्छ धुवून त्यात हिंग, हळद घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावें. नंतर कणिक घेऊन त्यात मीठ, तूप घालून पाणी टाकून भिजवून घ्यावी.कढईत साजूक तूप घालून त्यात जिरे, हिंग घालावे. कांदा, आले लसूण पेस्ट, मिरची तुकडे परतून घ्यावे.त्यात टमाटे, तिखट ,हळद घालून घोटलेली डाळ घालावी. त्यात मीठ टाकावे.कणिक भिजली की त्याची पोळी लाटून वाटीने त्याच्या पुऱ्या कराव्या.ह्या पुऱ्यना फुलाचा आकार द्यावा. चहुबाजूने घेऊन मध्य भागात पुरी दाबावी. असे हे पीठे उकळलेल्या वरणत सोडावे. ते मऊ शिजले की गॅस बंद करावा. त्यात कोथिंबीर बारीक चिरून घालावी. वरून साजूक तूप घ्यावे. 


बिहार मधील दाल पिठा(Dal Pitha) ही पारंपरिक रेसईपी आहे.आपण वरण फळ किंवा डाळ चिखल्या करतो त्याप्रमाणे करावे. 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२