सर्वात वर

खमंग लसूण शेव

शीतल पराग जोशी 

Garlic Sheve

साहित्य: 2 वाटी चणा डाळीचे पीठ, 1 वाटी मैदा, 2 वाट्या बटाट्याचा किस, 5 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, 8 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून हळद, मीठ, तेल, सोऱ्या


कृती: मैदा व डाळीचे पीठ चाळून घ्यावे. एक मलमलचा कपडा घेऊन हे कोरडे पिठाचे मिश्रण त्यात घालून त्याची सैलसर पुरचुंडी बांधावी. कुकरमध्ये एका डब्यात ही पुरचुंडी ठेवून दोन शिट्ट्या कराव्यात. तोपर्यंत मिरच्या, लसूण, कोथिंबीर,मीठ मिक्सरला बारीक करून घ्यावे. अगदी बारीक करावे.  बटाटे उकडून घ्यावे. त्यानंतर हे वाफवलेले पीठ पुरचुंडीतून काढून मिक्सरला फिरवून घ्यावे. सर्व मिश्रण ताटात काढून घ्यावे. त्यात मिरची, लसूण पेस्ट घालावी. उकडलेला बटाटा किसून घालावा. आणि हे सगळे मिश्रण छान मळून घ्यावे. पाणी अजिबात घालू नये. नंतर एक सोऱ्या घेऊन त्याला शेवेची बारीक छिद्रांची ताटली लावावी. एक कढई घेऊन त्यात तेल टाकून ते तापण्यास ठेवावे. सोऱ्याला तेल लावून त्यात हे मिश्रण टाकून त्याने शेव कढईत घालावी. मंद आचेवर शेव (Garlic Sheve)तळावी. जास्त वेळ तळू नये.मस्त  हिरवा रंग येतो. शेव खूप टेस्टी लागते.


चला मग करुन नक्की. साधी शेव आपण नेहेमी खातो. पण ही शेव नक्की करून बघा.खुप वेगळी टेस्ट लागते.  मी Z मराठीवर ” आम्ही सारे खवय्ये” मध्ये दिवाळी पूर्वसंध्येला ही शेव (Garlic Sheve) दाखवली होती.मग करून बघा 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२