सर्वात वर

फालुदा

शीतल पराग जोशी 
आता उन्हाळा चालू आहे. तर थंड खायला आपल्याला आवडते ना. मग घरच्या घरी फालुदा (Faluda Recipes) कसा बनवायचा ते बघू या. 

साहित्य: १ लिटर दुध, 2 चमचे कस्टर्ड पॉवडर, 1 वाटी साखर, 1 चमचा तुळशी/ सब्जा बी, 2 चमचे शेवया, बदाम, काजू, रोझ सिरप, व्हॅनिला आइसक्रीम


कृती: तुळशीचे बी आदल्या दिवशी भिजत घालावे. ते फुगून येतात. तुळशी बी थंड असते. दूध थोडे गरम करून घ्यावे. एका वाटीत थोडेसे दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर मिसळून घ्यावी. आणि मग ही पावडर दुधात टाकून सतत ढवळत राहावे. मग साखर घालावी. दूध थंड झाले की फ्रीजमध्ये ठेवावे. घरच्या शेवया थोड्या पाण्यात उकळून घ्याव्या. आणि त्या चाळणीत उपसून घ्याव्या. गार झालेले दूध फ्रिजमधून काढून घ्यावे. एका ग्लासमध्ये रोझ सिरप टाकून घ्यावे. यात तुम्ही वेगवेगळे फ्लेवर वापरू शकतात. मँगो, पायनापल जे आवडेल ते सिरप घालू शकतात. आता आपण रोझ सिरप वापरतोय. नंतर ग्लासमध्ये थोडे भिजवलेले तुळशी बी घालावे. थोड्या वाफवलेल्या शेवया घालाव्या. आणि त्यावर थंड दूध घालावे. आणि ते चमच्याने ढवळून घ्यावे. त्यावर तुमच्या आवडीच्या आईस्क्रीमचा एक स्कुप घालावा. परत वरून थोडे रोझ सिरप घालावे. काजू बदामाचे तुकडे घालावे. आणि मग असा हा फालुदा (Faluda Recipes) खाण्यास द्यावा. किती सोपा आहे ना. मग करून बघा घरच्या घरी. साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. बाहेर  जाऊन खाण्यापेक्षा घरीच करून बघा.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२