सर्वात वर

इडली फ्राय चाट

शीतल पराग जोशी 

आपल्याकडे इडली केली की ती चटणी, सांभार बरोबर आपण खातो. आणि उरली की इडली फ्राय (Idli Fry Chaat)केले जाते. तर आज आपण इडली चाट करून बघू या.

साहित्य: ७ इडल्या, 1 कांदा,1 टोमॅटो, 1 बटाटा, 2 हिरव्या मिरच्या, 6 पाकळ्या लसूण, 20 पुदिना पाने,  मूठभर कोथिंबीर, चिंच 4 बुटुक, अर्धी वाटी गुळ, 5 खजूर, 2 टीस्पून चाट मसाला, अर्धी वाटी शेव, मीठ, तिखट, दही 

Idli Fry Chaat Recipes

कृती: इडलीचे लांबटसर तुकडे करून घ्यावेत.किंवा चाकूने कापावे. एका इडलीचे 5 तुकडे करावे. एक कढई घेऊन त्यात तेल घालावे. ते तापले की त्यात हे इडलीचे तुकडे खरपूस तळून घ्यावेत. 1 बटाटा उकडून घ्यावा.  कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. मिरची, कोथिंबीर, पुदिना, लसूण आणि थोडे मीठ घालून त्याची बारीक चटणी करून घ्यावी. चिंच, गूळ, खजूर यांची पण चटणी करावी. उकडलेला बटाटा पण बारीक चिरून घ्यावा. एका मोठ्या बाउलमध्ये इडलीचे फ्राय केलेले तुकडे घालावे. नंतर त्यावर कांदा, टोमॅटो, बटाटा, चाट मसाला, तिखट घालावे. त्यावर पुदिना चटणी, आणि चिंच खजूर चटणी घालावी. चांगले मिक्स करून घ्यावे. वरून कोथिंबीर आणि शेव घालावी.आवडत असल्यास दही घालावे. झाली आपली इडली फ्राय चाट (Idli Fry Chaat) तयार. मग करून बघा. आणि मस्त खा.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२