सर्वात वर

कोबीच्या वड्या

शीतल पराग जोशी 

सध्या कोबी चांगला मिळतोय. तीच ती भाजी खाऊन कंटाळा येतो ना. मग अशा कुरकुरीत वड्या(Cabbage Sticks) करून बघा मुलेही आवडीने खातील.

साहित्य:-२ वाटी गड्डा कोबी किस, 1 वाटी हरभराडाळ पीठ,1 चमचा तांदूळ पीठ, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून तिखट, 1 चमचा कोथिंबीर, मीठ,तेल, 1 टिस्पून मोहोरी, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हिंग, 1 मिरची

कृती:- कोबी स्वच्छ धुवून किसून घ्यावी. नंतर ह्या किसात तिखट, मीठ, तेल घालावे. धने, जिरे पावडर घालावी.चाट मसाला आणि मीठ टाकून चांगले कालवून घ्यावे. हवी असल्यास तुम्ही मिरची बारीक चिरून घालू शकतात.त्यात हरभरा डाळ पीठ आणि तांदूळ पीठ घालून  कणकेप्रमाणे भिजवावे. तांदूळ पीठाने वड्या क्रिस्पी होतात.त्यात कोथिंबीर घालावी. एक मोठे पातेले घेऊन त्यात पाणी घालावे. ते उकळले की त्यावर एक चाळणी ठेवावी. त्याला तेल लावावे. त्यात हे कोबीचे लांबट रोल करून 15 मिनिटे वाफवून घ्यावे. हे रोल गार झाले की त्याचे काप करावेत. नंतर एक पॅन घेऊन त्यात थोडे तेल घालावे. त्यात जिरे, मोहोरी, हिंग घालावा. मिरची तुकडे घालावे. त्यात हे कोबीचे काप घालावेत. चांगले खरपूस फ्राय (Cabbage Sticks) करावेत. आणि पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करावे. ह्या वड्या तळयच्या नाहीत. 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२