सर्वात वर

कुरकुरीत गरेलू

शीतल पराग जोशी 

हा आंध्र प्रदेशात केला जाणारा कुरकुरीत गरेलू (Kurkurit Garaylu) पदार्थ आहे.छान क्रिस्पि लागतो. शिवाय पौष्टिक आहे. कमी वेळात होतो.

साहित्य: 1 वाटी तांदूळ पीठ, 1/2 वाटी मूग डाळ भिजवलेली, 1 कांदा, 1 मिरची, 1 टीस्पून तीळ, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर,1 टीस्पून तिखट,6 लसूण पाकळ्या, 1 चमचा कोथिंबिर, कढीपत्ता, 2 मिरची, तेल, मीठ

कृती: एका बाउल मध्ये तांदूळ पीठ घेऊन त्यात भिजलेली मूग डाळ घालावी. बारीक चिरलेला कांदा, लसूण ,मिरची पेस्ट घालावी. तिखट, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, तीळ आणि थोडे तेल घालावे. थोडे गरम पाणी घालून गोळा चांगला मळून घ्यावा. 10 मिनटं गोळा ठेवून द्यावा. नंतर त्याचे छोटे गोळे घेऊन ते प्लास्टिक कागदावर थापावे. उडीद वडे करतो त्याप्रमाणे करावे. कडेला थोडे तडे पडत असल्यास पाण्याचा हात लावावा. नंतर एका कढईत तेल घेऊन ते तापण्यास ठेवावे. त्यात हे गरेलू तळून घ्यावेत. खूप कुरकुरित (Kurkurit Garaylu) होतात. चला मग करून बघा एखाद्या संध्याकाळी चहाबरोबर छान लागतात.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२