सर्वात वर

मसूर पुलाव

शीतल पराग जोशी 

मसूर हा आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. मसूर मध्ये खूप फायबर असते. आपल्या हृदयासाठी मसूर खूप उपयोगी आहे. ईमुनिटी पॉवर वाढवण्यासाठी मसूर आणि मसूर डाळ खुप उपयोगी आहे. आपल्या स्किनसाठी पण मसूर खूप छान आहे.चला मग मसूर पुलाव (Masur Pulaav) करू या.

साहित्य: 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मोड आलेले मसूर, 1 कांदा, 7 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो, 1 इंच आले, १टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून जिरे,1 चमचा गोडा मसाला, 2 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला, तेल, मीठ, हवे असल्यास मटार ,टोमॅटो

कृती: तांदूळ धुवून घ्यावेत. मोड आलेले मसूर घ्यावेत. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. आले, लसूण पेस्ट करावी. एक पॅन किंवा कुकर घेऊन त्यात तेल घालावे. तेल तापले की त्यात जिरे, मोहोरी घालावी. ते तडतडले की त्यात हिंग घालावे. कांदा लालसर परतवला की त्यात आले लसूण पेस्ट घालावी. मग टोमॅटो घालावा.तिखट, हळद, दोन्ही मसाले घालावे.त्यात मसूर आणि तांदूळ घालून चांगले परतवून घ्यावे. पाणी घालून मीठ पण घालावे. मग झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्याव्यात. झाला आपला मस्त मसूर पुलाव (Masur Pulaav) तयार. 

ताज्या कैरीच्या लोणच्याबरोबर हा मसूर पुलाव (Masur Pulaav) खूप छान लागतो.  सोबत पापड, कांदा घेऊ शकतात. करा मग लवकर.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२