सर्वात वर

मटार वडे

शीतल पराग जोशी

Matar Vade

साहित्य:- 2 वाटी मटार, 2 चमचे कोथिंबीर, 4 मिरच्या, अर्धी वाटी खोवलेला नारळ, 1 कांदा, 2 चमचे कोथिंबीर, 8 लसूण पाकळ्या,1 टीस्पून लिंबूरस, तेल, मीठ

कव्हर(पारी):-1 वाटी हरभरा डाळ पीठ, 1 टीस्पून ओवा, 10 पालकाची पाने, चिमूटभर सोडा, मीठ, तेल

कृती:-प्रथम मटार चाळणीवर थोडे वाफवून घ्यावें. ते थोडे जाडसर मिक्सर वर फिरवून घ्यावे. मिरची, लसूण,कोथिंबीर बारीक करून घ्यावी. खूप बारीक करू नये. कढईत थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा. त्यावर हे मिरची, लसूण वाटण घालावे. मटार भरड घालावी. मिश्रण चांगले परतवले की त्यात मीठ, लिंबू, खोबरे घालावे.  मिश्रण थंड झाले की त्याचे छोटे गोळे करावेत.

कव्हरसाठी चणा  डाळ पीठ घेऊन त्यात पालकाची पाने वाटून घालावीत. मीठ, ओवा, सोडा घालून भजीच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यावे. छान हिरवा रंग येतो .त्यावर 1 चमचा कडकडीत तेल घालावे. एक कढई घेऊन त्यात तेल टाकून ते तापवण्यास ठेवावे.मग हे मटारचे गोळे ह्या मिश्रणात बुडवून तेलात तळून घ्यावेत. हिरवेगार मटार वडे (Matar Vade) तयार होतात.  मस्त लालचुटुक सॉस आणि हिरवे मटार वडे अप्रतिम कॉम्बिनेशन दिसते. करून बघा नक्की.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी

संपर्क-९४२३९७०३३२