सर्वात वर

मोदकाची आमटी

शीतल पराग जोशी 

आपण मोदक नेहेमी खातो. पण त्याची आमटी (Modkachi Aamti) कधी खाल्ली नाही ना. पण हा तिखट मोदक म्हणून आज ही करून बघू या.

(Modkachi Aamti)

साहित्य: १ वाटी चना डाळीचे पीठ, 1 चमचा कणिक, तेल, मीठ


सारण: १ वाटी खोबऱ्याचा किस, 2 चमचे खसखस, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 8 लसूण पाकळ्या, मीठ


कृती :चना डाळीचे पीठ घेऊन त्यात थोडी हळद, तेल, मीठ आणि थोडी कणिक घालून पीठ चांगले मळून घ्यावे. ते झाकून ठेवून द्यावे. 


ग्रेव्ही: १ कांदा, 6 लसूण पाकळ्या, 2 चमचे खोबरे, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून जिरे, 1 इंच आलेवरील कांदा, खोबरे लालसर भाजून घ्यावे. नंतर वरील सगळे साहित्य घेऊन त्यात थोडे पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. हा ग्रेव्ही मसाला तयार झाला.


सारण: नंतर एक पॅन घेऊन त्यात थोडेसे तेल टाकून त्यात खोबरे किस, खसखस, लसूण पाकळ्या, जिरे  परतवून घ्यावे. हे सगळे ताटात काढून गार झाले की त्यात तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ,धने जिरे पावडर घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. हे आपले सारण तयार झाले. 
नंतर कणकेचे छोटे गोळे घेऊन त्याच्या पुऱ्या कराव्यात. त्यात हे वर केलेले सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्यावा. असे 10, 12 मोदक करावेत.  

नंतर एक पातेले घेऊन त्यात तेल घालावे. जिरे तडतडले की ग्रेव्ही मसाला घालून तेल सुटेस्तोवर परतावे. आणि त्यात पाणी घालावे. ते उकळले की त्यात हे वर केलेले मोदक सोडावे. मोदक शिजले की वरुन कोथिंबीर घालावी. अशी ही मोदकाची आमटी (Modkachi Aamti) खूप टेस्टी लागते. भाकरी,पोळी, भात कशाबरोबर पण खाऊ शकतात.करून बघा मग..

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२