सर्वात वर

नागलीची सुरळी वडी

शीतल पराग जोशी 

आपण हरभरा पिठाची सुरळीची वडी नेहेमी करतो. आता ही नागलीची सुरळी वडी (Naglichi Surali Vadi) करून बघू. नाचणी (नागली) थंड असते. त्यात प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर असते. मग काय करून बघणार ना तुम्ही पण.

साहित्य : 1 वाटी नागलिपीठ, 1 वाटी ताक ( ताक आंबट हवे), 1 वाटी पाणी, मीठ चवीनुसार,खोबरे किस, कोथिंबीर, 1 टीस्पून मोहोरी, 2 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हींग, 1 मिरची

कृती : नागलीच्या पिठात, मीठ, ताक, पाणी, मिरची वाटून घालावी. हे नीट कालवून घ्यावे. गुठळी राहू देऊ नये. एक जाड बुडाचे पातेले किंवा एक कढई घेऊन त्यात हे पीठ घालून मध्यम आचेवर ढवळत राहावे. पीठ हळूहळू घट्ट व्हायला लागते. तोपर्यंत उपड्या ताटाना तेल लावून घ्यावे.  चमच्याने पीठ बघून घ्यावे. पीठ असे चमच्यावरून सालीसारखे निघाले की झाले म्हणून समजावे. नंतर हे पीठ पातळसर असे ताटावर पसरावे. वरून कोथिंबीर, खोबरे पसरावे. 

फोडणी : तेल घेऊन ते तापले की त्यात जीरे, मोहोरी, हिंग टाकून ही फोडणी ह्या वड्यांवर टाकावी. मग चाकूने 1 इंची पट्टी कापून त्याची गुंडाळी करावी. वरून देखील तुम्ही कोथिंबीर, खोबरे टाकू शकतात.चला मग ह्या नविन  सुरळीवडी (Naglichi Surali Vadi) करून बघू या आणि खाऊ या.

संपर्क-संपर्क-९४२३९७०३३२ 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी