सर्वात वर

नवरत्न पुलाव

शीतल पराग जोशी 
आपण भाताचे अनेक प्रकार करतो. अनेक भाज्या टाकल्या की भात टेस्टी पण होतो. आणि पौष्टिक पण लागतो. चला मग आज आपण नवरत्न पुलाव (Navratna Pulav)कसा करतात ते बघूया 

साहित्य : 2 वाटी साधा किंवा बासमती तांदूळ, १ तमालपत्र, 2 लवंग,अर्धी वाटी फ्रेंच बिन्स, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी मटार, 2 बटाटे, 2 कांदे, 2 टमाटे, अर्धी वाटी फ्लॉवर कोबी, 100 gm पनीर, साजूक तूप, 1 टीस्पून जिरे, मीठ, थोडी कोथिंबीर, लिंबूरस, ओला नारळ किस ,

पुलाव मसाला : ,८ पाकळ्या लसूण, 4 काश्मिरी मिरच्या, 1 इंच आले तुकडा, 2 टीस्पून धने पावडर, 2 टीस्पून जिरे, चिमूटभर मीठ

कृती: वर दिलेले पुलाव मसाला साहित्य  घेऊन मिक्सरला फिरवून पुलाव मसाला तयार करून घ्यावा. तांदूळ धुवून अर्धा तास ठेवून द्यावे. त्यानंतर कुकर किंवा पॅन घेउन त्यात थोडे तुप घालावे. त्यात तमालपत्र आणि लवंग टाकून तांदूळ परतून घ्यावा. त्यात उकळते पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. तांदूळ कोणता आहे त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवावे. फक्त भात शिजला पण पाहिजे आणि मोकळा पण हवा. तो एका ताटात पसरवून ठेवावा.

सर्व भाज्या चौकोनी चिरून घ्याव्यात. नंतर त्या थोडया वाफवून घ्याव्यात. खूप शिजवू नये. एक पसरट कढई घेऊन त्यात तूप घालावे. त्यात थोडा लांब चिरलेला कांदा घालावा. वर बनवलेला पुलाव मसाला घालावा. नंतर ह्या भाज्या चांगल्या परतवून घ्याव्यात. पनीरचे तुकडे घालावे. बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. हे सगळे  शिजले की त्यात हा भात घालावा. मीठ घालावे. हवे असल्यास लिंबूरस घालावा. 5 मीनीट झाकण ठवून चांगली वाफ येऊ द्यावी. झाला आपला नवरत्न पुलाव (Navratna Pulav) तयार. 

सर्व्ह करताना वाटीला तूप लावून त्यात हा भात घालून डिशमध्ये मूद करावी. त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर, नारळ किस घालून थोडे वरून साजूक तूप घालावे. वा वा तोंडाला पाणी सुटले ना. चला मग करा असा पौष्टिक पुलाव तयार. मुले खिचडी खात नाहीत. असा पुलाव (Navratna Pulav) केला की लगेच खातील. सगळ्या भाज्या पण पोटात जातील.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२