सर्वात वर

रवा बेसन टोस्ट

शीतल पराग जोशी 

Rava Besan Toast

साहित्य : 1 वाटी रवा, अर्धी वाटी बेसन, 2 चमचे लसूण मिरची पेस्ट, 1 टीस्पून हळद, किंचित हिंग ,1 चमचा ओवा, पालक 20 पाने, दाणे कुट 4 चमचे, 2 मिरची, मूठभर कोथिंबीर, लिंबू, मीठ, टोमॅटो सॉस 

कृती : रवा, बेसन, मीठ, तिखट, लसूण, मिरची पेस्ट,ओवा टाकून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यावे. पालकांची पानें, लसूण, मिरची पेस्ट, दाणे कूट, लिंबू रस, मीठ, कोथिंबिर घालून त्याची बारीक चटणी करावी. ही चटणी हिरवीगार दिसते. नंतर ब्रेडच्या स्लाईस  घ्याव्या. त्याच्या कडा हव्या असल्यास काढाव्या. एका ब्रेडला ही पालकाची चटणी लावावी. दुसऱ्या ब्रेड स्लाईसला टोमेटो सॉस लावावा. नंतर हे दोन्ही ब्रेड एकमेकांवर ठेऊन घ्यावे. कढई तापत ठेवून त्यात तेल घालावे. तेल तापले की त्यात ह्या ब्रेड स्लाईसला रवा बेसनाचे जे मिश्रण आहे त्यात बुडवून गरम तेलात तळाव्यात. मस्त गुलाबीसर होऊ द्याव्यात. तळायचे नसल्यास तव्यावर थोडे तेल टाकून दोन्ही बाजूने शैलो  फ्राय करून घ्यावे. 

असे हे गरम रवा बेसन टोस्ट (Rava Besan Toast) संध्याकाळी चहा बरोबर सर्व्ह करावेत. झटपट होतात.  मुले ही खुश आणि मोठे पण खुश.


टीप : पालकाची पाने हवी असल्यास थोडी शिजवून घ्यावी.

संपर्क-९४२३९७०३३२

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी