सर्वात वर
AC Ad

रवा बटाटा पुऱ्या

रेखा केतकर 

Rava Potato Puri

साहित्य : 1 वाटी रवा , 3/4 उकडलेले बटाटे , 1 छोटी वाटी बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे , 1 छोटी वाटी कोथिंबीर , 1 चमचा हळद , 1 चमचा ओवा , मीठ चवीनुसार , 2 चमचे चिलीफ्लेक्स , 2 वाट्या कणिक ( गव्हाचे पीठ )


कृती :(Rava Potato Puri) प्रथम 1 वाटी रवा 1 वाटी गरम पाण्यात 15 मिनिटं भिजवून ठेवायचा नंतर त्यात उकडलेले बटाटे किसून घालायचे नंतर त्यात चवीनुसार मीठ , मिरच्यांचे तुकडे , हळद , कोथिंबीर , चिलीफ्लेक्स , ओवा घालून मिश्रण मिक्स करून घेऊन त्यात 2 वाट्या कणिक घालून पुऱ्यांची कणिक भिजवावी 5 मिनिटांनी त्याच्या पुऱ्या लाटून घेऊन तळाव्यात आणि गरमगरम सॉस बरोबर खायला द्याव्यात

या रवा बटाटा पुऱ्या (Rava Potato Puri) लहान मुलांपासून घरातील मोठी माणसे देखील चवीने खातात लॉक डाउन च्या काळात लहान मुलांना रेडिमेड पॅकेट मधून तयार केलेल्या रेसिपी पेक्षा या पुऱ्या ते आवडीने खातील 

Rekha Ketkar
रेखा केतकर 

संपर्क -+919004657496

Ac square