सर्वात वर

कणकेचे शाही सामोसे

बातमीच्या वर

शीतल पराग जोशी
साहित्य :- 1 वाटी कणिक, 2 चमचे रवा, 2 चमचे तेल, मीठ, लिंबूरस, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 8 मोठे उकडलेले बटाटे, 1 वाटी मटार दाणे, 6 पनिरचे तुकडे,10 मिरच्या, 1इंच आले, 1टीस्पून जिरे, 1 टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, तेल, कढीपत्ता, कोथिंबीर

कृती:- कणिक घेऊन त्यात रवा घालावा. त्यात मीठ घालावे. ओवा घालावा. तेल थोडे तापवून त्यात घालावे. नंतर पाण्याने घट्टसर भिजवून घ्यावे. तेल लावून गोळा ठेवून द्यावा.

सारण: उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यावे. मटार थोडे वाफवून घ्यावे. पनीरचे छोटे तुकडे करून घ्यावे. आले मिरची पेस्ट करावी.  पेस्ट जरा जास्तच घ्यावी. नंतर कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहोरी, घालावी. हिंग घालावे. आले मिरची पेस्ट घालून कढीपत्ता टाकावा. धने, जिरे पावडर टाकावी. त्यात हळद,तिखट, मसाला घालावा. त्यावर स्मॅश केलेले बटाटे, वाफवलेले मटारदाणे, पनिरचे तुकडे टाकून चांगले हलवून घ्यावें.सगळे छान मिक्स झाले की, त्यात मीठ आणि लिंबूरस घालावा. वरून कोथिंबीर टाकून सारण थंड होण्यास ठेवून द्यावे.

नंतर कणकेची छोटी गोळी घेऊन ती थोडी लाटून त्याचे दोन भाग करावे. नंतर 2 टोके पाणी लावून जॉईन करून घ्यावे. म्हणजे कोन तयार होईल. त्यात हे सारण भरून तो उरलेलं भाग पाण्याने चिटकवून घ्यावेत. असे सामोसे तयार होतात. एक कढई घेऊन त्यात तेल टाकावे. तेल तापले की गॅस कमी करून त्यात हे सामोसे टाकून मंद आचेवर तळून घ्यावे.त्याबरोबर मिरच्या तळून घ्याव्यात. मस्त चिंचेची चटणी आणि मिरच्या बरोबर हे सामोसे सर्व्ह करावेत. तुम्हाला सामोसे किती हवे आहेत, त्यानुसार कणकेचे प्रमाण कमी जास्त करावे. सामोसे गरमच खावेत. 

टीप : तुम्ही मैदा वापरत असाल तर आता एकदा कणिक वापरून करून बघा. म्हणजे घरातील वयस्क व्यक्ती  पण खाऊ शकतील. पनीर मूळे अजून पौष्टिक होतात. काय मग करून बघा आता.

shital parag joshi

संपर्क-९४२३९७०३३२ 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली