सर्वात वर

साबुदाणा क्रिस्पि स्टिक

शीतल पराग जोशी 

उपवासाचा एकदम फक्कड पदार्थ आहे. थालीपिठ, साबुदाणा वडा, खिचडी आपण नेहेमी करतो. आता ह्या (Sabudana Crispy Stick) साबुदाणा क्रिस्पी स्टिक करून बघू.

साहित्य: १ वाटी साबुदाणा पीठ, 1/2 वाटी शिंगाडा पीठ, 4 बटाटे, 2 मिरची, 1 टीस्पून लिंबूरस,मीठ, तूप किंवा तेल, कोथिंबीर, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून जिरे, 2 चमचे दाणे कूट

(Sabudana Crispy Stick)
कृती: साबुदाणा भाजून तो मिक्सरला फिरवून घ्यावा. त्याचे पीठ बनवावे. बटाटे उकडून ते स्मॅश करून घ्यावेत. त्यात तिखट, मिरची तुकडे, मीठ, जिरे किंवा जिरा पावडर घालावी. थोडा लिंबूरस घालावा.दाणे कूट घालावा. नंतर त्यात साबुदाणा पीठ, शिंगाडा पीठ आणि कोथिंबीर घालून चांगले मळून घ्यावे. कोथिंबीर उपासाला खात नसल्यास घालू नये. तुपाचा हात लावून चांगले मळून घ्यावे.

नंतर एक सोऱ्या घ्यावा. पितळी अथवा जो असेल तो घ्यावा. त्याला चकलीची ताटली लावावी. सोऱ्याला तूप वा तेल लावून घ्यावे. नंतर ह्या पिठाचा एक गोळा यात टाकून सोऱ्या बंद करून त्याच्या लांब स्टिक बनवाव्यात. चकली करु नये. एक कढई घेऊन त्यात शेंगदाणा तेल घालावे. अथवा तूप घालावे. नंतर ह्या स्टिक तेलात लालसर तळून घ्याव्यात. मध्यम आचेवर तळाव्यात. म्हणजे क्रिस्पि होतात.

यावर नंतर तुम्ही थोडी पिठीसाखर भुरभुरू शकतात. करून बघा मग  साबुदाणा क्रिस्पी स्टिक. ह्याबरोबर थोड्या हिरव्या मिरच्या तळून त्यावर मीठ आणि दाणे कूट घालावा. ह्या क्रिस्पी स्टिकबरोबर (Sabudana Crispy Stick) ह्या मिरची पण द्याव्यात. चला करा मग लवकर.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२