सर्वात वर

साबुदाणा वडा


शीतल पराग जोशी 

आज संकष्ट चतुर्थी आहे ना. गरमागरम साबुदाणा वडे (Sabudana Vada) खायला मजा येईल ना. चला मग करू या.

साहित्य: २ वाटी साबुदाणा, 4 बटाटे, 1 वाटी दाण्याचा कूट, 4 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून तिखट, मीठ, जिरे, कोथिंबीर, शेंगदाणा तेल अथवा तूप.

कृती: साबुदाणा आदल्या दिवशी भिजवून घ्यावा. साबुदाणा छान मऊ आणि मोकळा असला पाहिजे. बटाटे उकडून ते स्मॅश करून घ्यावेत. मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. कोथिंबीर उपासाला खात नसल्यास घालू नये. साबुदाणा, बटाटा, दाण्याचा कूट, मिरची तुकडे, मीठ, जिरे किंवा जिरेपूड, आणि तिखट घालून सगळे मिश्रण चांगले मिक्स करावे. एक कढई घेऊन त्यात शेंगदाणे तेल अथवा तूप घालावे. एक प्लास्टिक पेपर घेऊन त्यावर छान साबुदाणा वडे (Sabudana Vada) थापून तळून घ्यावेत. गोल्डन रंगावर वडे तळावेत. दह्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे. 

दह्याची चटणी

1 वाटी दही घेऊन त्यात साखर, मीठ, जिरेपूड, तिखट, थोडा दाण्याचा कूट घालून चटणी मिक्स करून घ्यावी. आणि गरमागरम साबुदाणा वड्याबरोबर सर्व्ह करावी. करा मग आज साबुदाणा वडे (Sabudana Vada). आणि करा खुश सगळ्यांना.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२