सर्वात वर

व्हेज लॉलीपॉप

शीतल पराग जोशी 

Veg Lollipop

साहित्य:१ कांदा, कोबी पाव वाटी, गाजर पाव वाटी, फरसबी पाव वाटी, सिमला मिरची पाव वाटी, 2 बटाटे ( फिंगरचिप साठी), २ वाटी कॉर्नफ्लोअर, पाव वाटी मैदा, पाव वाटी शेजवान सौस, 2 चमचे चिली सौस, 2 चमचे टोमॅटो सौस, 1 टीस्पून मिरेपूड, मीठ, तेल

कृती:- सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्या. कांदा बारीक चिरून घ्यावा.  बटाट्याचे साल काढून त्याचे फिंगरचिप्स बनवावेत. (बटाट्याचे उभे जाडसर तुकडे कापावेत). नंतर हे सर्व भाज्यांचे मिश्रण घेऊन त्यात कॉर्न फ्लोअर, मैदा, शेजवान सौस, चिली सौस, टोमॅटो सौस, मिरपूड, मीठ घालून चांगले मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे बनवावेत. एका हातावर बटाट्याची लांब चिप घेऊन त्यावर टोकाला हे पिठाचे गोळे लावावेत. त्याला साधारण लॉलीपॉपचा आकार द्यावा.  एक कढई घेऊन त्यात तेल घालावे.  तेल तापले की त्यात हे लॉलीपॉप तळून घ्यावेत. हे बटाट्याचे फिंगर चिप्स लॉलीपॉप ची दांडी म्हणून आपण वापरतोय. ते ही  छान तळले जातात. गरमागरम लॉलीपॉप (Veg Lollipop) टोमॅटो सौस बरोबर सर्व्ह करावेत. 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२