सर्वात वर

व्हाइट ढोकळा

शीतल पराग जोशी 

(White Dhokla Recipe)

साहित्य: 3 वाटी तांदुळ, 1 वाटी उडीद डाळ, 4 मिरच्या, 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आले,  3 चमचे कोथिंबीर, 3 टीस्पून खोबरे किस, 2 टीस्पून मोहोरी, 2 टीस्पून जिरे, कढीपत्ता, 2 टीस्पून तीळ, तेल


कृती: तांदूळ आणि उडीद डाळ धुवून 6 तास भिजत घालावी. त्यानंतर  बारीक वाटून घ्यावी. हे मिश्रण 7 तास तसेच ठेवून द्यावे. छान वरती पीठ फुगून येते. आणि आंबटसर पण होते. मग यात आले, लसूण वाटून घालावे. मीठ, थोडे तेल आणि सोडा घालावा. चांगले मिक्स करून घ्यावे.हा ढोकळा पांढराच हवा.  एकीकडे स्टिमर मध्ये पाणी घालून ते पाणी उकळले की एक खोलगट भांडे घेऊन त्याला तेल लावावे. त्यात हे ढोकळयाचे मिश्रण घालावे. त्यावर झाकण ठेवावे. १० मिनिट वाफ येऊ द्यावी.  ढोकळे गार झाले की चाकूने चौकोनी कापावेत. त्यानंतर एक छोटी कढई घेऊन त्यात तेल घालावे. जिरे, मोहोरी तडतडले की त्यात  तीळ, कढीपत्ता,मिरच्या घालाव्या. आणि ढोकल्यावर ही फोडणी घालावी. वरून कोथिंबिर आणि खोबरे किस घालावा.  अप्रतिम लागतो हा पांढरा ढोकळा (White Dhokla Recipe)सॉस किंवा चटणी बरोबर खा.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२