सर्वात वर

फ्रुट सॅलड

शीतल पराग जोशी 

या दिवसात जेवणाच्या शेवटी काहीतरी गोड खावेसे वाटते ना. चला मग करू या फ्रुट सॅलड(Fruit Salad).

साहित्य :1 लिटर दूध, 4 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर, 2 वाट्या साखर, 1सफरचंद, 1 चिकू, 1 आंबा, 1पपई, थोडी गोड द्राक्ष, 2 केळी, 2 गोड संत्री, 1 वाटी डाळिंब दाणे, काजू,बदामाचे काप अर्धी वाटी

कृती :1 लिटर दुधातील थोडे दूध बाजूला काढून ठेवावे. नंतर हे उरलेले दूध तापवण्यास ठेवावे. जे काढून ठेवलेले दूध आहे त्यात कस्टर्ड पावडर घालून चांगले मिक्स करून घ्यावे. त्यात गुठळी ठेवू नये. नंतर गरम दुधात हे कस्टर्ड दूध, साखर घालून मंद आचेवर दूध सतत हलवत राहावे. कस्टर्ड दुधात शिजल्यावर दुधाला छान घट्टपणा येतो. तुम्ही साखरेचे प्रमाण कमी पण करू शकतात. नंतर हे दूध थंड होण्यास ठेवावे.

वर दिलेली सगळी फळे स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावे. मग जे कस्टर्ड दूध थंड होण्यास ठेवले आहे ते घेऊन त्यात हे सर्व फळाच्या फोडी टाकून चांगले कालवून घ्यावे. त्यात सजावटीसाठी काजू, पिस्ते, बदाम घालावेत.  मस्त गारेगार फ्रुट सॅलड (Fruit Salad) तयार होईल. सगळे जण खूप खुश होतील. त्यानिमित्ताने सगळी फळे पोटात जातील.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी

संपर्क-९४२३९७०३३२